भुसावळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

पालकमंत्र्यांचे सामाजीक दायीत्व : चंद्रकांत पाटील व सेना तालुकाप्रमुख समाधान यांच्या मार्गदर्शनाखाली सेना पदाधिकार्‍यांना राबवला उपक्रम

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भरीव मदतीने, जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळातील गोर गरीब 70 परीवारांना मदतीचा हात म्हणून गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, तूर डाळ, हळद, तिखट, मीठ, साखर व चहापत्ती असे जीवन आवश्यक सामानाचे वाटप करण्यात आले.

उपासमार होवू नये हाच उद्देश
संचारबंदी असल्याने सर्व सामान्य जनतेची उपासमार होऊ नये या मुख्य उद्देशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे पाठवण्यात आलेला सामान भुसावळ शहराचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्या मार्फत वाटप करण्यात आला. प्रसंगी गणेश पाटील, भूषण भोळे, निलेश पाटील यांनी सहकार्य केले. संचारबंदी असल्याने सर्व सामान्य नागरीकांचे हाल होत असून यामध्ये विविध कामगार वर्ग शहरात मिळेल ते काम करून आपली उदरनिर्वाह करीत आहे. काहींना कामच नसल्याने परीस्थिती बिकट झाली आहे तसेच काही दिवसांपासून हातावर पोट असलेल्या नागरीकांना उपासमारीची वेळ आली आहे. नागरीकांची अडचण समजून घेत शहरातील उपेक्षित व गरजू नागरिकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या माध्यमातून मदत करीत असल्याचे बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले.

Copy