भुसावळात किरकोळ कारणावरून माय-लेकास मारहाण : सात आरोपींविरुद्ध गुन्हा

0

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप : झाडे तोडल्यावरून उफाळला वाद

भुसावळ : शहरातील मुक्तानंद कॉलनीत उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना तक्रारदाराने गल्लीतले लोक झाडाखाली गाड्या लावत असल्याने झाडे तोडायला का लावतात? असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी माय-लेकास मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात आरोपींविरुद्ध गुन्हा
सागर नामदेव रोझतकर (28, मुक्तानंद कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, विलास निंबाळकर, जयदीप विलास निंबाळकर, निखील संतोष झांबरे, प्रसाद पाटील, ललित उर्फ लल्ला पाटील, मुकेश कुमावत (राजस्थानी), प्रतीक देशमुख यांच्याविरुद्ध दंगल व अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या घराबाहेर उंबराच्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याने त्यांनी संबंधितास ज्या फांद्या नडत नसतील त्या तोडू नये, असूे सांगितले तसेच संशयीत आरोपींना झाडाखाली गल्लीतील सर्व लोक गाड्या लावत असताना झाडे का तोडायला लावतात? अशी विचारणा केल्याचा राग आल्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत तक्रारदाराच्या घुसून त्यांच्यासह त्यांच्या आई फुलवंतीबाई (50) यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड करीत आहेत. दरम्यान, जखमी माय-लेकांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Copy