भुसावळात काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

0

भुसावळ : राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जे आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना या संसर्गाशी लढा देऊन जनतेचे संरक्षण करणार्‍या शहातील कोरोना योद्ध्यांचा शुक्रवार, 19 रोजी काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला.

या योद्ध्यांचा झाला सत्कार
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस कर्मचारी, सीआरपीएफचे जवान, महसूल विभागाचे तहसीलदार, भुसावळ नगर परीषदेचे वैद्यकीय अधिकारी, परीचारीका व सफाई कामगार तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. कोरोनासारख्या कठीण काळात जनतेसाठी अहोरात्र झटणार्‍या योद्ध्यांचे प्रसंगी कौतुकही करण्यात आले. कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्या सर्वांचा सत्कार करणं, त्यांचा मान-सन्मान करणं हे आपले आद्य कर्तव्य नव्हे तर आपली प्रत्येकाची नैतीक जबाबदारी असल्याचे ाँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील, ईस्माईल गवळी, प्रवीण पाटील, दिलीप क्षिरसागर, संदीप मोरे उपस्थित होते.

Copy