भुसावळात काँग्रेसच्या संघर्ष यात्रेनिमित्त 4 रोजी जाहीर सभा

0

माजी मंत्री अशोक चव्हाणांसह सुशीलकुमार शिंदे व राधाकृष्ण विखे पाटलांची राहणार उपस्थिती

भुसावळ- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे काढण्यात येणार्‍या संघर्ष यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवार, 4 रोजी सायंकाळी सहा वाजता आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवर जाहीर सभा होणार आहे. सभेत शायर मो.इमरान (प्रतापगढ) जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी मंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.उल्हासराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संघर्ष यात्रेनिमित्त भुसावळात आढावा बैठक
संघर्ष यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळात काँग्रेसची बैठक झाली. त्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष रवींद्र निकम यांनी कार्यक्रमाची रूपरेषत्त सांगितली. डॉ.सुवर्णा गाडेकर, मो.मुन्वर खान, युवकचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी सूचना मांडली. जाहिर सभेसाठी वेगवेगळ्या कमेट्या गठीत करण्यात आल्या. सूत्रसंचालन सरचिटणीस रहीम कुरेशी यांनी केले.

यांची होती बैठकीला उपस्थिती
मागासवर्गीय उपाध्यक्ष भगवान मेढे, तस्लीम पहेलवान, विजय तुरकेले, सलीम गवळी, गफूर गवळी, डॉ.शोएब पटेल, शैलेश अहिरे, प्रकाश मोरे, रघुनाथ चौधरी, राजेंद्र पटेल, वरणगाव शहराध्यक्ष अशफाक काझी, युवकचे तालुकाध्यक्ष इम्रान खान, महेबूब खान, विलास खरात, प्रदीप नेहेते, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे, सी.पी.हरणे, फकरूद्दीन बोहरी, अ‍ॅड.प्रमोद चव्हाण, प्रमोद चौव्हाण, अन्वर तडवी, पुष्पा वानखेडे आदींसह पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित असल्याचे सरचिटणीस रहिम कुरेश कळवतात.

मुक्ताईनगरात काँग्रेस पक्षाची नियोजनात्मक बैठक
मुक्ताईनगर- काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने नियोजन बैठक झाली. डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अंतुर्ली येथील माजी सरपंच शरद महाजन होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव आसिफ खान यांनी केले. याप्रसंगी तालुका अध्यक्षपदी आत्माराम जाधव यांची फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. प्रदेश प्रतिनिधी सलिम मंत्री, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस.ए.भोई, डॉ.जगदीश पाटील, संजय पाटील, अ‍ॅड.अरविंद गोसावी, बी.डी.गवई यांनी याप्रसंगी मार्गदर्शन व सूचना केल्या. 4 रोजी प्रवर्तन चौकात मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले.

यांची बैठकीला उपस्थिती
याप्रसंगी गौरव पाटील, प्रा.पवन खुरपडे, नीरज बोराखडे, समद आझाद, अनिल सोनवणे, नामदेव मिठाराम भोई, मोहन मुरहेकर, ज्ञानदेव पाटील, रामराव पाटील हे उपस्थित होते. सूत्रसंचालन आसीफ खान यांनी तर आभार प्रा.सुभाष पाटील यांनी मानले. संघर्ष यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मोठ्या संख्येने येत असल्याने शेतकरी बांधव, महिला, युवक व विद्यार्थी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Copy