भुसावळात कंटेन्मेंट खुला करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन

0

भुसावळ : शहरातील अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर भागातील कन्टेटमेंट झोन खुला करण्यासाठी बुधवार, 17 जून रोजी परीसरातील रहिवाशांना सोबत घेऊन विशाल ठोके, प्रा.धीरज पाटील, नितीन सराफ, कुशल पाटील, उमेश लोखंडे, लव झाडगे, मंगेश कवी यांनी भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

रुग्ण घरी परतल्याने परीसर खुला करण्याची मागणी
अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर येथे 19 मे 2020 या दिवशी कोरोना रुग्ण आढळून आले होते. हे रुग्ण बरे होऊन घरी आलेले आहे. नियमानुसार कालावधी पुर्ण झाल्यानंतर सुद्धा परीसर बंद ठेवण्यात आला आहे. या भागात एक महिना होऊन सुद्धा नवीन कोरोना रुग्ण सापडलेले नाही. परीसर बंद असल्यामुळे परीसरातील नागरीकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे म्हणून अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगरातील कन्टेमेंट झोन खुला करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. नागरीकांनी परीसरात सोशल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण गर्दी करू नये, ज्येष्ठांनी घरातच थांबावे अश्या सूचना नागरीकांना विशाल ठोके यांनी केल्या आहेत.

Copy