भुसावळात एकास ठार मारण्याचा प्रयत्न : आरोपीला अटक

0

भुसावळ : जुन्या भांडणाच्या वादातून एकास गच्चीवरून फेकत जीवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पसार आरोपीस बाजारपेठच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. देवेन्द्र उर्फ बापू विनोद जावरे (31) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जुन्या वादातून एकास गच्चीवरून फेकले
26 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी अजय गिरधारी गोडाले (27, रा.भुसावळ) यास आरोपी देवेंद्र जावरेने जुना वाद उकरून काढत गोडाले यास घराच्या गच्चीवरून फेकून दिले होते व या प्रकरणी 27 रोजी बाजारपेठ पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संशयीत पसार झाला होता. आरोपी गडकरी नगर भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास रविवारी अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.फौजदार तस्लिम पठाण, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, तुषार पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, दिनेश कापडणे, सुभाष साबळे, सचिन चौधरी व होम गार्ड सुरळकर आदींनी केली. तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे व नाईक समाधान पाटील करीत आहेत.

Copy