रावेर तालुक्यात वॉश आऊट : अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ

0

रावेर : रावेर तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांसह दारू भट्ट्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यात अवैध दारू व दारू भट्टे यांच्यावर पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई करत पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला गुन्हा मोरव्हाल येथील पिंटू न्यामतं तडवी यांच्यावर दाखल करण्यात आला. त्याच्याकडून एक हजार 600 रुपयांची दारू व तयार करायचे साधने जप्त करण्यात आली. दुसरा गुन्हा उज्ज्वला वाघोडे (रा.मोरगाव) यांच्यावर दाखल झाला आहे. त्यांच्याकडून सुमारे साडे तीन हजाराच्या 68 प्लॅस्टिक सीलबंद बाटल्या तसेच तीन हजार सहाशेची प्लास्टिक डब्यात भरलेली 90 लिटर तयार दारू नष्ट करण्यात आली. तिसरा गुन्हा मोरव्हाल येथील सुलेमान तडवी यांच्या वर दाखल झाला. त्याच्याकडून एक हजार 600 रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई कॉन्स्टेबल संदीप धनगर, हवालदार निर्मला नन्नवरे आदींनी केली.