भुसावळात एकावर धारदार शस्त्राने हल्ला : तिघा आरोपींना अटक

0

भुसावळ : शहरातील भारतनगर भागात घराजवळ दुचाकीचा हॉर्न वारंवार वाजवल्याचा जाब विचारल्याने वाद होऊन एकाच्या गालावर धारदार शस्त्राने हल्ला चढवण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली. या हल्ल्यात राहुल बाळू चौधरी हा युवक जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असून तिघा आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

तिघा आरोपींना केली अटक
भारत नगरात रविवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास चौधरी यांच्या घराबाहेर एक युवक दुचाकीचा हॉर्न वाजवत फिरत होता. त्याला जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. घटनेनंतर संशयित दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्रांनी चौधरीच्या गालावर धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणी चौघां आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी शंकर राजू भालेराव (19, रा.भारत नगर, भुसावळ), पवन उर्फ विक्की विलास कुटे (21, महात्मा फुले नगर) व मयूर विनोद भालेराव (19, भारत नगर, भुसावळ) या तिघा आरोपींना अटक करण्यात आली. जखमीला डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले असून उपचारार्थनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.

Copy