भुसावळात ईदच्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची मागणी

0

भुसावळ : शहरात पवित्र रमजान ईदच्या दिवशी नगरपालिकेने मुस्लीम बहुल भागात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहिम मुसा कुरेशी यांनी केली आहे. ईदच्या दिवशी पाणी सोडल्यास मुस्लीम बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याने पालिका प्रशासनाने यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पालिका रोटेशन प्रमाणे शहरात पाणीपुरवठा करीत असलीतरी सणाचे औचित्य साधून दखल घ्यावी, अशी अपेक्षा कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. आमदार संजय सावकारे, पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे, विरोधी नगरसेवक उल्हास पगारे यांनी याबाबत लक्ष घालावे, असेही कुरेशी यांनी कळवले आहे.

Copy