भुसावळात इंडियन रेल्वे टिकट चेकिंग स्टाफ ऑर्गनायजेशनतर्फे गरजूंना मदतीचा हात

0

रेल्वेतील बांधवांसह खाजगी कर्मचार्‍यांना संकट काळात जीवनावश्यक वस्तूंमुळे मोठी मदत

भुसावळ : रेल्वेचे वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेल्वे टिकट चेकिंग स्टाफ ऑर्गनाइजेशन भुसावळ मंडळाने आपले सामाजिक कार्य निरंतर सुरु ठेवत 50 हजारांची मदत पंतप्रधान निधीला दिली असून दिड लाखांच्या रकमेतून रेल्वेशी संबंधित कुली, स्वच्छता कामगार, विश्रामगृहात कार्यरत कामगार व काही खाजगी कर्मचार्‍यांना संकटकाळात मदत गरजेची असल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यास सुरुवात केल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पहिल्या फेरीत 250 जणांना मदतीचा हात
मदतीच्या पहिल्या फेरीत 250 जणांना मदत करण्यात येत असून सर्वप्रथम 50 कुलींना हे किट देण्यात आले. यात पाच किलो आटा, तीन किलो तांदुळ, एक किलो तुरदाळ, एक किलो रीफाईंड तेल, एक किलो पोहा, एक किलो साखर, हळद, धणे व मिर्ची पावडर, एक किलो मीठ पावडरचा समावेश आहे. सोबतच रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या श्रमिकांना बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहाय्यक वाणिज्य प्रबंधक पाठक, डिसीटीआय आलुवालिया, वाय.डी.पाठक, ए.पी.धांडे, निसार अहमद, व्ही.के.सचान, ए.एस.राजपूत, डी.एम.कापगते, एस.व्ही.खरात व सर्व तिकीट तपासणीस विभागाने परीश्रम घेतले.

Copy