Private Advt

भुसावळात आरटीओ अधिकार्‍यांची फसवणूक : तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ : शहरात वाहन परवाना काढताना आरटीओ अधिकार्‍यांची फसवणूक केल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला असून या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कैलास ब्रिजलाल छाबडा, जी.डी. (नाव, गाव पूर्ण माहित नाही) व अन्य एका अज्ञाताने वाहन परवाना काढताना अर्जावर डमी उमेदवाराचा फोटो लावून हजर केले व दिशाभूल करून वाहन परवाना तयार करून घेतल्याची बाब उपप्रादेशिक परीवहन विभागाने 29 ऑक्टोबर 2020 रोजी कार्यालय अभिलेखाच्या तपासणीदरम्यान उघड झाली. दरम्यान, याबाबत कैलास छाबडा यांना जळगाव उपप्रादेशिक कार्यालयात हजेरी लावण्यास बजावल्यानंतरही त्यांनी कोरोना कारण देत उपस्थिती दिली नाही व कार्यालयाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने मोटार वाहन निरीक्षक सचिन प्रमोद सानप (34, मकरंद कॉलनी, महाबळ, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मोहम्मद वली सैय्यद करीत आहेत.