Private Advt

भुसावळात आमदार गायकवाडांच्या प्रतिमेला अंडे मारून वक्तव्याचा निषेध

अ‍ॅट्रॉसिटी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याचा संविधान आर्मी पदाधिकार्‍यांनी केला निषेध : 12 रोजी बुलढाण्यात ‘तलवार मोर्चा’

भुसावळ : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा भुसावळातील संविधान आर्मीच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याला पदाधिकार्‍यांनी अंडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात रविवारी दुपारी जुन्या पालिकेसमोरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.

12 रोजी बुलढाण्यात ‘छत्रपती शिवाजी तलवार मोर्चा’
आंदोलनापूर्वी माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर दुपारी पत्रकार परीषद झाली. यावेळी जगन सोनवणे म्हणाले की, आमदार गायकवाड यांनी न शोभणारी भाषा केली असून त्यांचा आम्ही निषेध करतो. गायकवाड यांनी दहा हजारांची फौज उभी करण्याची भाषा केली असून हिंमत असेल गोपीचंद पडकरांविरोधात त्यांनी फौज उभी करावी, 12 आमदारांची नियुक्ती न करणार्‍या राज्यपालांविरोधात त्यांनी फौज उभी करावी, असे आपले त्यांना आव्हान असल्याचे ते म्हणाले. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ 12 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘छत्रपती शिवाजी तलवार मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली व या दिवशी महाराष्ट्र बंदची घोषणाही त्यांनी केली. यावेळी पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांनी माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांची पीआरपीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली व त्यांचा सत्कारही केला.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला पीआरपी जिल्हाध्यक्षा पुष्पा सोनवणे, संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आरीफ शेख, ओबीसी सेल संघटक जिल्हाप्रमुख गोपी साळी, संविधान आर्मी युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश मोरे, संविधान आर्मी युवा जिल्हाध्यक्ष राहुल साळुंखे, संविधान आर्मी उपाध्यक्ष रतन वानखेडे, धरणगाव युवा तालुकाप्रमुख जमील बेग खलील बेग, संविधान आर्मी प्रदेश प्रचार प्रमुख संघपाल किर्तीकर, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाध्यक्ष हरीष सुरवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.