भुसावळात आज रीपाइंचा महामेळावा

Repai National President Ramdas Athawale today in Bhusawal Mahamela of Repai भुसावळ : रीपाइं (आठवले गट) पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, 3 रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पक्षाचा महामेळावा होत आहे. या प्रसंगी भीमगीतांचा कार्यक्रम होईल. या मेळाव्यासाठी रीपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मंत्र्यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
रीपाइंच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, 3 रोजी सायंकाळी होणार्‍या रीपाइंच्या मेळाव्याला राज्यभरातून सुमारे 15 हजार कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींसह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाध्यक्षांकडून मेळाव्याचे यशस्वी नियोजन
या कार्यक्रमासाठी रीपाईंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या माध्यमातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सभा स्थळी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून व्यासपीठाची उभारणी करण्यात आली. भुसावळ विभाग, जिल्ह्यासह राज्यभरातून तब्बल 15 हजार कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आवाहन आयोजक जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केले आहे.