Private Advt

भुसावळात अष्टभूजा देवीचा रथोत्सव

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीचा रथही शुक्रवारी जागेवरच दहा पावले ओढण्यात आला. यावेळी भाविकांनी रथाची पूजा केली. देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदीरात भाविकांची गर्दी होती तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. दोन वर्षानंतरच रथाचे दर्शन भाविकांना घेता आले.

यांची होती उपस्थिती
विजय ठक्कर, विशाल ठक्कर तसेच पूजारी अशोक भट आदी यावेळी उपस्थित होते. सायंकाळी मंदिरापासून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक अष्टभुजा देवी मंदीर, नृसिंह मंदीर, विठ्ठल मंदिर, गांधी चौक, मरीमाता मंदीर, आठवडे बाजार, गंगाराम प्लॉट भागातून पुन्हा अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन झाले.