भुसावळात अवैधरीत्या दारू विकणार्‍या आरोपीस अटक

0

भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागातील मुरकटी गल्लीच्या बाजूला आरोपी गौरव राजेंद्र वाघ (28, रा.शिवाजी नगर, भुसावळ) हा बेकायदा विदेशी दारूची विक्री करीत असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 130 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. त्यात मास्टर ब्लेंड कंपनीच्या 520 रुपये किंमतीच्या चार बाटल्या तसेच 280 रुपये किंमतीच्या आय.बी.कंपनीच्या दोन बाटल्या तसेच 330 रुपये किंमतीची किंगफिशर बियर च्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तुषार पाटील, महेश चौधरी, समाधान पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.