भुसावळात अविवाहित महिलेची आत्महत्या

0

भुसावळ : शहरातील शारदा नगर भागातील 56 वर्षीय अविवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नंदा सीताराम नवले (56) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ श्याम सीताराम नवले (65, शारदा नगर, ग्रीन पार्क अपार्टमेंट, एक नंबर पत्री शाळेसमोर भुसावळ) यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महिलेने बारीक पिळदार दोरीने खिडकीला गळफास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. प्रभारी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय विनोदकुमार गोसावी, एएसआय सुरेश महाजन, भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी भेट दिली. तपास एएसआय राजेंद्र नाईक करीत आहेत.

 

Copy