भुसावळात अल्पवयीन मुलीची आत्महत्या : एकाला अटक

0

भुसावळ : शहरातील महात्मा फुले नगरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी मोबाईलवर मुलाशी बोलत असल्याच्या कारणावरून त्या मुलीला मारहाण करून तिचा अपमान केल्याने या मुलीने घरात आत्महत्या केल्याची घटना घडली 16 जुलै रोजी घडली होती. या घटनेत तबस्सुम शेख शरीफ (14) हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अरुण मधुकर कुटे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्बस्सुम ही मुलगी पंकज नावाच्या मुलाशी मोबाईलवर बोलत असताना अरुण मधुकर कुटे यांनी पाहिले आणि त्या मुलीस शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच तुझ्या वडिलांना तू कशी आहेस, मी आता सांगतो असे सांगितले यामुळे घाबरलेल्या मुलीने 16 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते नऊच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुलीचे वडील शेख शरीफ शेख शब्बीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण मधुकर कुटे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.

Copy