भुसावळात अपर पोलिस अधीक्षकांची भेट : कंटेनमेंट झोनची केली पाहणी

0

भुसावळ : अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सोमवारी शहराला भेट देत समता नगर, पंचशील नगर, शांती नगर, सिंधी कॉलनी आणि महेश नगर भागाची पाहणी केली. यावेळी नवटके यांनी बंदोबस्ताचा आढावा घेत कंटेनमेंट झोन मधून कुणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना केल्या. प्रसंगी बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे निरीक्षक, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.

पोलिस मित्रांसह कर्मचार्‍यांना मास्क बांधण्याच्या सूचना
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी कंटेनमेंट झोनची पाहणी करीत शहरातील एकूण बंदोबस्ताचा आढावा घेतला. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी आणि पोलिस मित्र, होमगार्ड यांना पाणी जागेवरच देण्याच्या सूचना त्यांनी करीत पोलिस कर्मचार्‍याने आणि पोलिस मित्रांनी तोंडाला मास्क बांधण्याच्या सूचना केल्यात.

Copy