भुसावळात अज्ञाताने दुचाकी पेटवली

0

भुसावळ : शहरातील पी.ओएच.कॉलनीत घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञातने पेटवून दिल्याची घटना 4 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेतील नोकरदार सीमा भरत सोनवणे या पीओएच कॉलनीत राहतात. कुटुंबासह त्या झोपल्या असताना घराबाहेर त्यांनी काळ्या रंगाची दुचाकी (एम.एच.19 डी.ए.3403) लावली असताना मध्यरात्री 2 दोन वाजेच्या सुमारास दुचाकीने पेटली असल्याची माहिती वडील भरत सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड केल्याने शेजारील नागरीक जमा झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दुचाकी पेटवल्याबाबत कुणावरही संशय नसल्याचे सोनवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.