जळगाव जिल्ह्यात अजून ५ कोरोना पॉजिटीव्ह

0

खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील तीन व्यक्तीचा समावेश.

भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 450 झाली आहे.