भुसावळातील 32 वर्षीय युवकाची आत्महत्या

वडिलांना बोलावण्यासाठी मुलगी गेल्यानंतर घटना झाली उघड

भुसावळ : पाच वर्षीय मुलगी पित्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर वडील काही बोलत नसल्याने तिने कुटुंबियांनी घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी धाव घेतली असता 32 वर्षीय युवक असलेल्या गल्यानंर आनंद नगरातील रहिवासी व कन्ट्रक्शन कर्मचारी रीतेश शंभु राठोड (वय 32) यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. सोमवारी रात्री नऊच्या वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

साडीने पंख्याला घेतला गळफास
शहरातील आनंद नगरातील रहिवासी रीतेश राठोड हे त्यांच्या वडीलांसोबत कन्ट्रक्शनचे काम करीत होते मात्र सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी वडिलांना बोलासण्यासाठी पाच वर्षीय मुलगी प्रियंका गेल्यानंतर ते काहकी बोलत नाहीत, असे मुलीने घरच्यांना सांगताच घरच्यांनी धाव घेतली असता गळफास घेतल्याचे घटना उघडकीस आल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला. डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात राठोड यांना हलवल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी विक्की राठोड यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Copy