भुसावळातील 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

भुसावळ : शहरातील श्रीराम नगर, कोंडेवाडी भागातील तरुण अतुल गोविंदा बोरोले (24) याने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत अतुलने जामनेर रोडवरील वाघूर नदीच्या जुन्या पूलावर दुचाकी उभी करून खिश्यातील मोबाईल व पाकीट रूमालात बांधून एका मलुाच्या हाती घरी पाठवले व आत्महत्येपूर्वी मावसभावाशी दुसर्‍याच्या मोबाईलवरून संपर्क करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. मासेमारी करणार्‍यांनी जामनेर पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला. यावेळी पोलिस निरीक्षक इंगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नदीत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार झाल्याने मृतदेह शोधण्यास अडचणी येत होत्या. अतुलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच नगरसेवक निर्मल कोठारी, अ‍ॅड. बोधराज चौधरी, नितीन धांडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोठारी हे पहाटे चारपर्यंत तेथे तळ ठोकून होते तर शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अतुलचा मृतदेह सापडला. त्जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.