Private Advt

भुसावळातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ : शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना भुसावळसह अमरोली, जि.सुरत येथे घडली. या प्रकरणी पीडीतेने बुधवारी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी हर्षल मच्छिंद्र पारधी (20, पंचशील नगर, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात अत्याचार व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटुंबियांना मारण्याची धमकी
अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी हर्षल पारधी हा पीडीता घरी एकटी असताना आल्यानंतर त्याने अत्याचार केला तसेच अमरोली, जि.सुरत,गुजरात येथेदेखील नेवून अत्याचार करण्यात आला शिवाय पीडीतेच्या आईसह भावाला काहीतरी करून टाकेल, अशी धमकीदेखील दिली. पीडीतेने या संदर्भात बुधवारी बाजारपेठ पोलिसात धाव घेतल्यानंतर आरोपीविरोधात गुरनं.06/22, भादंवि 376, 506 व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहेत.