भुसावळातील हाणामारी प्रकरणातील आरोपींना अटक

भुसावळ : शहरात दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका गटातील पसार आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शेख दानिश उर्फ बबन शेख नासीर (27) व शेख नासीर शेख सरदार (52, दोघे रा.खडका रोड, मणियार हॉलजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हाणामारी प्रकरणी दाखल आहे गुन्हा
शहरातील खडका रोडवरील मणियार हॉल जवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ दोन गटात भांडण झाल्यानंतर 18 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार अर्फुनिसा शेख अफझल (49, आझाद नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या भावाला गाडी आडवी लावून तसेच रॉड व लाथाबुक्यांनी लाकडी दांड्याने संशयीतांनी मारहाण केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत पसार होते. संशयीत शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती मिळाल्यानंतर संशयीतांना अटक करण्यात आली. तपास सहा..निरीक्षक अनिल मोरे व नाईक समाधान पाटील करीत आहेत.