भुसावळातील सुशिक्षीत बेरोजगार मक्तेदार पालिकेच्या निविदेतून अपात्र

भुसावळ : शासनातर्फे सुशिक्षीत बेरोजगार युवकांना निविदा प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते मात्र धीरज अशोक चौधरी हे कामावर कार्यरत असतानादेखील त्यांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याबाबत नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत मक्तेदार चौधरी यांना निविदा प्रक्रियेत अपात्र घोषीत करण्यात आले आहे.

शासनाची दिशाभूल करीत प्रतिज्ञापत्र केले सादर
धीरज अशोक चौधरी यांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. शासकीय नियमानुसार सुशिक्षीत बेरोजगारांना निविदा प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. मात्र धीरज चौधरी हे 5 जुलै 2017 ते 19 एप्रिल 2021 पर्यंत कामावर कार्यरत होते. तरीदेखील त्यांनी शासनाची दिशाभूल करीत, खोटे शपथपत्र सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्याच्या नोंदणीत सादर केले आहे. याबाबत नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, चौकशी केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पालिकेस कळविले. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने चौधरी यांना अपात्र घोषीत करण्यात आले आहे.