भुसावळातील सिंधी कॉलनी युवतीची आत्महत्या

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी हर्षालीन अनिल सोडाई (21) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सिंधी कॉलनीतील राहत्या घरात छतास असलेल्या लोखंडी कडीला दोर बांधून हर्षालीन या युवतीने गळफास घेतला. याबाबत घरात माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. युवतीने आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनिल सोडाई यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करीत आहे.