भुसावळातील व्यापार्‍यावर चाकूहल्ला : तिघा आरोपींना अटक

3

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी जवळील लेंडीपुरा भागातील किराणा व्यावसायीक राजकुमार गोविंदराम आगीचा यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी चाकूहल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तस्लीम शेख काल्यासह शेख कलीम व धीरज (पूर्ण नाव) नाही यास अटक करण्यात आली आहे.

किराणा उधार न दिल्याने झाला होता चाकू हल्ला
आरोपी तस्लीम काल्याने 21 रोजी आगीच्या यांच्या दुकानावरून एक हजार 600 रुपयांचा किराणा उधार नेला होता तर 22 रोजी पुन्हा पाच हजारांचा किराणा उधार मागण्यासाठी तो लेंडीपुरा भागातील किराणा दुकानावर आल्यानंतर किराणा व्यावसायीक राजकुमार गोविंदराम आगीचा यांच्यात वाद झाला. यावेळी तस्लीम काल्या याने आगीच्या यांच्यावर चाकूने वार केला, त्यात ते जखमी झाले तसेच त्यांचा नातेवाईक पंकज गोपालदास रोयडा हा देखील जखमी झाला होता. आगीच्या यांच्यावर चाकू हल्ला झाल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांसोबत घटनास्थळ गाठले मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले झाले होते. रात्री उशिरा चौघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपी शेख कलीम व धीरज (पूर्ण नाव) यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर शनिवारी सायंकाळी कुविख्यात आरोपी तस्लीम काल्या यास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

Copy