भुसावळातील विवाहितेवर अत्याचार : आरोपीस अटक

भुसावळ शहरातील घटना : मुलाच्या अपहरणासह पतीला जीवे ठार मारण्याची संशयीताने धमकी देत केले कृत्य

भुसावळ : 30 वर्षीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. संशयीताने महिलेच्या पतीला ठार मारण्यासह मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मूभाई (रा. मुस्लीम कॉलनी, मोठी खानका जवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली.

त्रास असह्य झाल्याने पोलिसात तक्रार
शहरातील एका भागातील 30 वर्षीय महिलेवर संशयीत आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मूभाई (रा. मुस्लीम कॉलनी, मोठी खानका जवळ, भुसावळ) याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडीतेच्या पतीला ठार मारण्यासह तिच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी आरोपीने देत वर्ष 2020 मधील रमजान महिन्यापासून वारंवार अत्याचार केल्याचे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीचा त्रास अधिक वाढल्याने पीडीतेने हिंमत करून घरात हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात बुधवारी रात्री तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन पुढील तपास करीत आहे.

Copy