Private Advt

भुसावळातील लॉजमधील देहव्यापार प्रकरण : सातही आरोपींना एका दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद लॉजमध्ये चालणार्‍या देहविक्री प्रकरणाचा पोलिसांनी भंडाफोड करीत पाच महिलांची सुटका केली होती तसेच हॉटेल मालकासह सात संशयीतांना अटक करण्यात आली होती. संशयीतांना मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. दरम्यान, मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या पाचही महिलांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हॉटेल मालक, मॅनेजरसह सात ग्राहकांना अटक
सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांची सुटका करीत त्यांना ताब्यात घेतले आहे तर बेकायदेशीरपणे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी आनंद लॉजचे मालक हरीष नागदेव फालक (62, गायत्री मंदिराजवळ, भुसावळ), हॉटेल मॅनेजर राजेंद्र मुरलिधर नेमाडे (65, नंदनवन कॉलनी, भुसावळ), हेल्पर दीपेन रवींद्र सुरवाडे (40, वानखेडे कॉलनी, भुसावळ) यांच्यासह आंबटशौकीन ग्राहक शुभम दिनकर बरकले (24, कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ), अकबर शहा कादर शहा (32, दिनदयाल नगर, भुसावळ), शेख सत्तार शेख जब्बार (41, विवरा खुर्द, ता.रावेर), मोहसीन गंभीर पिंजारी (45, शिरसोली प्र.बो., ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली होती तर संशयीतांविरोधात पीटा अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.