Private Advt

भुसावळातील रेल्वे स्थानक रस्त्याचे काम अखेर मार्गी : नगरसेवक कोठारींचा यशस्वी पाठपुरावा

भुसावळ : भुसावळातील रेल्वे स्टेशन रस्त्याची पालिका व रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुरुस्ती रखडल्याने वाहनधारकांसह रेल्वे प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पालिकेने 50 टक्के निधी दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काम करण्याची भूमिका घेतली होती मात्र रेल्वेचा 30 टक्के कचरा खेडी डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो व तेथील बायोमायनिंग प्रकल्पासाठी पालिकेने साडेतीन कोटी खर्च केले असून पर्यायाने यात लागलेला पैसा हा जनतेच्या कर स्वरूपातील आहे. रेल्वे प्रशासन रस्त्याचे काम करणार नसेल तर 30 टक्के म्हणून एक कोटी पाच लाख रुपये रेल्वेने पालिकेला द्यावेत, अशी मागणी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी डीआरएम एस.एस.केडीया यांच्याकडे 28 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी निवेदनाद्वारे करीत आंदोलनाचा इशारा दिला होता शिवाय पालिकेच्या सभेतही याबाबत विषय मांडला होता. कोठारींच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्टेशन रस्त्याचे बीबीएम केले असून लवकरच डांबरीकरण पूर्णत्वास येण्याची आशा आहे.

जागृक नगरसेवकाचा यशस्वी पाठपुरावा
विकासाचे व्हिजन असलेतरी की अशक्यप्राय बाब काहीच नाही, हे नगरसेवक पिंटू कोठारींनी भुसावळकरांना दाखवून दिले आहे. प्रभागातील विकासकामे असो की अडचणीतील नागरीक, कोठारी धावून आले नाही तर नवलच ! लॉकडाऊनमध्ये हजारो नागरीकांना मदतीचा हात देवून दातृत्वाचे ‘कोठार’ खुले करणार्‍या ‘निर्मल दातृत्वा’ ची महती एव्हाना भुसावळपार महाराष्ट्राभर पसरली आहे. भुसावळातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरून राजकारण पेटले असतानाच कोठारींनी डंपींग ग्राऊंडचा मुद्दा शोधून काढत रेल्वेने कचर्‍यापोटी पालिकेला भरपाई द्यावी अन्यथा कचरा टाकू न देण्याचा इशारा दिला आणि हा इशाराच काम करून गेला. रेल्वेने नुकतेच स्टेशन रस्त्याच्या बीबीएम कामाला सुरूवात केली असून लवकरच डांबरीकरण होईल, अशी आस भुसावळकरांना आहे. रेल्वे प्रशासनाचे मंडल अभियंता (विशेष कार्य) उमेश खरात यांनी कोठारी यांना लिखीत पत्र पाठवून 20 जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. कोठारी यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शहरातील रेल्वे स्थानक रस्त्याचा प्रश्न निकाली निघाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.