भुसावळातील रेल्वे यार्डात कंटेनरचा डबा घसरला

0

रेल्वे वाहतुकीवर परीणाम नाही ; सीवायएम कार्यालयाजवळील घटना

भुसावळ- मुंबईच्या जवाहर पोर्टवरून माल भरून आलेल्या कंटेनरचा एक डबा रेल्वे रूळावरील घसरल्याची घटना रविवार, 25 रोजी दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास रेल्वे यार्डातील सीवायएम कार्यालयाजवळील वळणावर घडली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे यार्डात अपघात झाल्याने सुदैवाने रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परीणाम झाला नाही शिवाय सुदैवाने जीवीतहानी टळली. घटनेचे वृत्त कळताच विभागीय परीचालन व्यवस्थापक एन.के.सिंग, सहाय्यक परीचालन व्यवस्थापक जे.एम.रामेकर, सीवायएम.एच.डी.मीणा, सीसीआय सुदर्शन देशपांडे, सीजीएस प्रवीण शर्मा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेल्वे यार्डचे आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत डबा रुळावर आणून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू होते. या रेल्वे अपघातात रुळांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Copy