भुसावळातील रेल्वे गँगमनचा अपघाती मृत्यू

0

मित्र गंभीर जखमी : राष्ट्रीय महामार्गावरील भोळे पेट्रोल पंपासमोरील घटना

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील भोळे पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील 23 वर्षीय रेल्वेत गेटमन म्हणून नोकरीस असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. या अपघातात रेल्वेतील गेटमन तुषार मुरलिधर पाटील (23, हनुमान नगर, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र मयुर गणेश बेंडाळे (27, हनुमान नगर, भुसावळ) हा जखमी झाला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या दुचाकीने तुषार व मयूर जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने तुषारच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मयूर गंभीर जखमी झाला. त्याच्या पायासह कमरेला मोठा मार बसला आहे. अपघाताचे वृत्त कळताच एएसआय तस्लीम पठाण व अडकमोल यांनी धाव घेतली. बुधवारी पहाटे उमेश सूर्यकांत पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील व बहिण असा परीवार आहे.

Copy