Private Advt

भुसावळातील राहुल सोनटक्के यांचा मनसे पक्षात प्रवेश

भुसावळ : भुसावळातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहूल सोनटक्के यांनी जळगावातील कार्यक्रमात मनसे पक्षात प्रवेश घेतला. आगामी काळात त्यांचे कार्यकर्तेही मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरात पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करू, असे सोनटक्के यांनी सांगितले.

जळगावात घेतला मनसेत प्रवेश
जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अ‍ॅड.जयप्रकाश बाविस्कर, नेते दिलीप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विनय भोईटे, रावसाहेब कदम, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून परीचीत असलेल्या राहुल सोनटक्के यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. या निमित्ताने त्यांचे उपस्थित पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. आगामी काळात शहरात मनसेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करू. लवकरच शहरातील कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.