भुसावळातील यावल रस्त्याच्या ‘सीलकोट कामाला’ अखेर सुरुवात

1

भुसावळ : भुसावळातील तापी पूल ते रींग रोडला जोडणार्‍या पाचशे मीटर रस्त्याचे खडीकरण झाले असलेतरी सीलकोटचे काम गेल्या दिवसांपासून रखडले होते. मध्यंतरी लॉकडाऊन झाल्यानंतर मजूर गावी निघून गेल्याने काम खोळंबले होते तर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्याची मागणी होत असतानाच शुक्रवारी ठेकेदाराने सीलकोटच्या कामाला सुरुवात केल्याने समाधान व्यक्त होत आहे. सीलकोटचे अपूर्ण असताना सातत्याने सुरू असलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे एक ट्रक अडकल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सीलकोटच्या कामाला मुहूर्त गवसला आहे.

शहरातील रस्त्यांचे काय?
आमदार संजय सावकारे यांनी लक्ष घातल्याने या रस्त्याचे काम पूर्ण होत असलेतरी तेथून पुढे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत येणार्‍या रस्त्यावर खड्डे पडले आहेत शिवाय अमृत योजनेमुळे शहरातील चांगल्या रस्त्यांची वाट लागली आहे त्यामुळे निदान तूर्त डांबरीकरण शक्य नसेल तर किमान मुख्य वर्दळीच्या रस्त्यांची तसेच अंतर्गत भागातील डागडूजी करण्याची माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

Copy