Private Advt

भुसावळातील मुस्लीम कॉलनीतून तीन तलवारींसह तरुण जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : आरोपीविरोधात आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील 23 वर्षीय तरुणाकडे तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुलाम गौस कालू शहा (23, मुस्लिम कॉलनी, बाहेर मस्जिदसमोर, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील संशयीत गुलाम गौस या तरुणाकडे घातक शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने त्यांनी बुधवारी पहाटे कारवाईचे आदेश दिल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एएसआय शरीफोद्दीन काझी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शहा, कॉन्स्टेबल सचिन पोळ, कॉन्स्टेबल अक्षय चव्हाण व योगेश माळी आदींच्या पथकाने तरुणाच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास धडक देत घराच्या गच्चीवरून तीन धारदार तलवार जप्त केल्या. संशयीत आरोपी तरुणाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुरनं.208/2022, भादंवि 4/25 प्रमाणे कॉन्स्टेबल जावेद हकीम शहा यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी करीत आहेत.