Private Advt

भुसावळातील महावितरणच्या अधिकार्‍याला नऊ लाखांचा गंडा

जळगाव : ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत भुसावळातील रहिवासी व महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता असलेल्या देवेंद्र सीडाम यांना आठ लाख 85 हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळातील तरुणाला गंडा
भुसावळ शहरातील शिवदत्त नगरात देवेंद्र मोतीराम सीडाम (33) हे वास्तव्यास आहेत. महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता म्हणून नोकरीला आहे. देवेंद्र सिडाम यांना 26 डिसेंबर 2021 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान विविध अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला. तसेच गोल्डबार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल अशी बतावणी संबंधितांनी केली. यावर विश्वास ठेवत देवेंद्र सिडाम यांनी 8 लाख 85 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर 25 लाख रुपयांचा नफा झाल्याचा असल्याचेही संबंधित अनोळखींनी फोनवरुन बोलतांना सिडाम यांना सांगितले मात्र प्रत्यक्षात आजपावेतो कुठल्याही नफ्याची रक्कम मिळाली नाही. तसेच गुंतवणूक केलेले आठ लाख 85 हजार रुपये न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आले. अखेर शनिवार, 2 एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्याने अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.