भुसावळातील मणप्पुरम बँकेतील सोने चोरी प्रकरण ; आरोपीच्या शोधार्थ युपीमध्ये पोलिसांची दोन पथके रवाना

A case against the manager in the case of gold theft in Manappuram Bank in Bhusawal भुसावळ : शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील बाजूस असलेल्या मणप्पुरम गोल्ड बँकेतील सुमारे दोन किलो वजनाचे व एक कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने बँकेचे मॅनेजर विशाल दिनानाथ रॉय (28, रसोली, पोस्ट सोहसा, जि.देवरीया, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा एरीया मॅनेजर अनिक सिंह सत्येंद्रकिशोर सिंह (30, अकोला) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ युपीत पोलिसांचे दोन पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

सुटीच्या दिवशी मारला दागिण्यांवर डल्ला
भुसावळातील मणप्पुरम बँकेत सुमारे दोन महिन्यांपूर्वीच मॅनेजर विशाल दिनानाथ रॉय (28, रसोली, पोस्ट सोहसा, जि.देवरीया, उत्तरप्रदेश) हे रूजू झाले होते तर बँकेतील सहकार्‍यांसोबत ते तुलसी नगरात भाड्याने घेतलेल्या घरात वास्तव्यास होते. शनिवार व रविवारी सुटी आल्याने बँक कर्मचारी आपापल्या गावाकडे रवाना झाले मात्र मॅनेजर विशाल रॉय हे रूमवरच थांबले व त्यांनी रविवारी सकाळी 8.20 वाजता बँकेत जावून तिजोरीतील दोन किलो 60 ग्रॅम वजनाचे सोने लांबवले. चोरी करताना रॉय यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले व बँकेला पुन्हा कुलूप लावून चाव्या तुलसी नगरातील रूमवरच ठेवल्या.