भुसावळातील मजुराचा खदानीत बुडून मृत्यू

भुसावळ : खदानीत हात-पाय धुताना तोल गेल्याने भुसावळातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. शुक्रवार, 24 रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील मांडवादिगर गावाजवळ ही घटना घडली. अब्दुल इब्राहिम शाह (28, दिनदयाल नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील ठेकेदाराने तालुक्यातील मांडवादिगर गावातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा ठेका घेतला आहे. काँक्रिटीकरणाचे काम आटोपून घराकडे निघालेले मजूर जवळच असलेल्या खदाणीच्या पाण्यात हायपाय धूत असताना अब्दुल इब्राहिम शाह (28, रा.दिनदयाल नगर, भुसावळ) यांचा तोल गेल्याने त्यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सहकारी मजुरांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भुसावळचे नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंह) ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून मृतक अब्दुल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळात आणण्यात आला.

Copy