भुसावळातील पोलिस अधिकार्‍यांनी सहकार्य करणार्‍या संस्थेचे मानले आभार

0

भुसावळ : जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोव्हिड 19 रोखण्यासाठी प्रशासन सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी कोणतेही विशेष सुरक्षा साहित्य नसतांना अहोरात्र परीश्रम घेत आहे. या अनुषंगाने शहरातील श्री रीदम मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चॅरीटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांना सहाय्य करणार्‍या स्वयंसेवक यांच्यासाठी गेल्या आठवड्यात मास्क व हातमोजे शहर पोलिस ठाण्यात भेट दिले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, आमदार संजय सावकारे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, रुग्णालयाचे संचालक डॉ.लक्ष्मीकांत नागला, डॉ.नितीन पाटील, चॅरीटेबलचे गौतम चोरडिया आदी उपस्थित होते. दरम्यान, कोव्हिड 19 या महामारीच्या काळात श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चॅरीटेबलने केलेल्या सहकार्याची दखल उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी घेतली असून तसे पत्र हॉस्पिटलला दिले आहे. रुग्णालय यापुढेही समाजहिताच्या उपक्रमात सहाय्य करेलच, असे मत रुग्णालयाच्या संचालकांनी व्यक्त केले आहे तसेच श्री कल्याणी चॅरीटेबल यापुढेही समाजकार्य सातत्याने करणार असल्याचे संस्थेच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे.

Copy