भुसावळातील नियोजित रेल्वे कारखान्यात स्थानिकांना नोकरी द्या

0

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची प्रांताधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ- रेल्वे उत्तर भाग तसेच दक्षिण भागातील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने नुकतेच काढल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले तर अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने रोजगारावर कुर्‍हाड पडलेल्या नागरीकांना, तरुण होतकरू मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रेल्वेतर्फे या भागातील जागेवर कारखाना तयार करण्यात येणार असून त्या कारखान्यात स्थानिक नागरीकांनाच रोजगार देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, शहर संघटक सुनील बागले, उपशहर प्रमुख राकेश खरारे, धनराज ठाकूर, पवन नाले, उपशहर संघटक सोनी ठाकूर, युवा सेना तालुका प्रमुख हेमंत बर्‍हाटे, मयूर जाधव, गौरव नाले, ऋषभ धांडे, भरत कुंभार, अनिकेत भिरुड उपस्थित होते.

Copy