Private Advt

भुसावळातील निखील राजपूतसह साथीदारांचे जामीन अखेर रद्द

भुसावळ : पोलिसांच्या यादीवरील संशयीत निखील राजपूतसह साथीदारांचे जामीन रद्द करावा, अशी विनंती भुसावळ पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर संशयीतांचे जामीन रद्द करण्यात आले आहेत. संशयीत राजपूत याच्यासह साथीदारांवर आता मोक्कान्वये कारवाई केली जाईल, असे अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

कारागृहात होणार रवानगी
संशयीत राजपूत याच्यासह टोळीने अलीकडील काळात पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याने संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता व नंतर संशयीताना अटक करण्यात आली. पोलिसांनी राजपूतसह टोळीविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केल्यानंतर त्यास नाशिक परीक्षेत्राचे महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली होती तर संशयीतांचे एका गुन्ह्यातील जामीन रद्द झाल्यानंतर संशयीताना ताब्यात घेवून त्यांची कारागृहात रवानगी केली जाणार असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. राजपूत यांच्या विरूध्द पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे.