Private Advt

भुसावळातील निकृष्ट पोषण आहाराचे नमूने तपासणीसाठी रवाना

भुसावळ :  तु.स. झोपे शाळेतून वाटप होणार्‍या पोषण आहाराच्या दर्जाबाबत वंचित आघाडीने तक्रार नोंदवल्यानंतर गोदामाता गुरुवारी सील ठोकण्यात आले होते. शुक्रवारी शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी धान्याचे नमूने घेत ते तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविले आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर कारवाईची दिशा ठरवण्यात येणार आहे.

पंचनामा करीत उघडले सील
शुक्रवारी शालेय पोषण आहार अधीक्षक अजीत तडवी यांनी शुक्रवारी धान्य गोदामाचे सील काढत रीतसर पंचमाना केला. यावेळी निकृष्ठ वाटत असलेला तांदूळ व अन्य धान्याचे नमुने घेत ते नमुने औरंगाबाद येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्या मापाने धान्याचे वितरण होते, त्यातही गैरप्रकार होत असल्याचा आरोप असल्याने संबंधित मापाची तपासणी केली असता ते बरोबर असल्याचे समोर आले.