भुसावळातील नाले सफाईबाबत नगरपालिका प्रशासनाला साकडे

0

भुसावळ : शहरात पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर अद्यापही नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने नगरपालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी केली आहे. गेल्या चार वर्षांपासून पालिका प्रशासन शहरातील नालेसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कुरेशी यांनी करीत शहरातील सर्व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच प्लॅस्टीक पिशव्या साचल्या असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास प्रभाग क्रमांक पंधरा मधील आगाखान वाडा परीसरातील पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तातडीने लक्ष देण्याची मागणी
सध्या शहरात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोरोना उपाय योजनेत व्यस्त आहे तर दुसरीकडे पावसाळ्युमळे साथीचे आजार जसे डेंग्यू, मलेरीया व टाईफाईड या अजारांचा सामना भुसावळकरांना करावा लागणार आहे. शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत नगरपालिका प्रशासनाने नाले सफाईबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Copy