भुसावळातील नगरसेवकांना नोटीस

0

भुसावळ । नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपाने अपक्ष नगरसेवकांसोबत आघाडी स्थापन करुन गटनेता पदाचा अर्ज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना सादर केला होता. भाजपाचे गटनेता म्हणून हाजी मुन्ना तेली यांना गटनेता पद बहाल केले होते. मात्र यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार 29 नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी जबाब नोंदविण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. निवडणुकीनंतर भाजपाने आपल्या पक्षाच्या व्यक्तीला गटनेता न करता अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपा-अपक्ष आघाडी या नावाने जिल्हाधिकार्‍यांकडे गट स्थापन करुन हाजी मुन्ना तेली यांना गटनेता म्हणून नियुक्त केले होते. मात्र यासंदर्भात जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. व स्थानिक स्वराज्य संस्था अर्हता अधिनियम 1987 प्रमाणे ही निवड अवैध असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.