भुसावळातील दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ – बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरी केल्याप्रकरणी संशयित आरोपीला डीपी शाखेने अटक केली आहे. निशांत मुरलीधर बोडवडे (32, रा.जाममोहला भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने दुचाकी (एमएच 19 एबी 9264) ची चोरी केली असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निशिकांत जोशी, तस्लिम पठाण, हवालदार माणिक सपकाळे, नाईक रवी बिऱ्हाडे, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अशांनी संशयित आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करत त्यास अटक केली. तपास हवालदार युवराज नागरुत करीत आहेत.

Copy