भुसावळातील दुचाकी चोरीचा उलगडा :आरोपी जाळ्यात

0

भुसावळ: शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परीसरातून 18 ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी गोपनीय माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिकन ताराचंद पवार (27, रा.नागद तांडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून नुकतेच ताब्यात घेतले असून चोरी गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या

शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी अजय गोपीचंद कामनानी यांची हिरो होंडा (एम.एच.19 डब्ल्यू 3787) ही दुचाकी 13 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी आरोपी भिकन पवारने लांबवल्याचा माहिती मिळाल्यानंतर त्यास जळगाव कारागृहातून ट्रान्सपर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने दुचाकी काढून दिली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.

Copy