Private Advt

भुसावळातील तरुणावर चाकू हल्ला

भुसावळ : दुचाकीवरील दोघांनी भुसावळातील तरुणावर चाकू हल्ला करीत त्यास लुटल्याची घटना शहरताील रींग रोड भागात शुक्रवारी रात्री घडली. चाकू हल्ल्यामुळे शुभम दिलीप खत्री (गडकरी नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील मेडिकल रुग्णालयात उसपचार सुरू आहेत. शुभम खत्री हा तरुण रींग रोड गडकरी नगर भागात दुचाकीवरून जात असताना दोघा संशयीत आरोपींनी त्याच्या दुचाकीला धडक दिली व चाकूने शुभमवर हल्ला चढवत त्याच्याकडील रोकडसह मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शुभम दिलीप खत्री याच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.जखमीचा जवाब घेण्यासाठी पोलीस रवाना झाले असून संशयीत लवकरच अटक होतील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.