भुसावळातील तरुणाची आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील लक्ष्मी नगरातील 32 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. भूषण अर्जुन ढाके (32, लक्ष्मीनगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत किरण रामभाऊ महाजन (गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत भूषण याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते तर चार महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी गेल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सायंकाळी भूषणने राहत्या घरी अचानक विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. तपास एएसआय कोलते करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परीवार आहे.

Copy