Private Advt

भुसावळातील तरुणाचा गोव्यातील समुद्रात बुडाल्याने मृत्यू

भुसावळ : मित्रांसोबत गोवा फिरण्यासाठी गेलेल्या भुसावळातील तरुणाचा समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला. विवेक सुरेश मुराई (25, गडकरी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, गुरूवार, 24 मार्च रोजी सकाळी मृत तरुणावर भुसावळात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

समुद्राच्या लाटेत बुडाल्याने मृत्यू
रींग कंपनीत अभियंता असलेला व भुसावळातील रहिवासी असलेला विवेक शनिवारी मित्रांसोबत गोवा येथे फिरायला गेला होता. त्याचे काही अन्य मित्रही तेथे येणार होते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विवेक याने त्यांच्या आईशी संपर्क ख्यालीखुशाली विचारली मात्र दुपारी बाराच्या सुमारास तो समुद्रातील पाण्यात गेला असता लाट आल्यानंतर वाहून गेला व त्याला बाहेर काढण्यात यश आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, विवेकच्या पश्चात त्याची उच्च शिक्षित बहिण व आई असा परीार असून मृतदेह गुरुवारी पहाटे शहरात आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.