भुसावळातील तत्कालीन तलाठ्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : बनावट शासकीय दस्तावेज तयार करून बनावट सातबारा उतार्‍याच्या आधारे शासन व तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळातील तत्कालीन तलाठी एन.आर.ठाकूर यांच्यासह मीरज खान अशरद खान, इमरान खान अशरद खान आणि जावेद खान अशरद खान यांच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ठाकूर हे पदावर असताना अनधिकृत बिनशेती वापराचे खळे प्लॉटचे खरेदी खत नोंदवण्यास शासन बंदी असल्याने अनधिकृत बिनशेती खळे प्लॉटवर पडीक शेतजमीन भासवण्यासाठी शेतीचा बनावट 7/12 उतारा तयार करण्यात आला व तो खोटा असतानाही त्यावर तलाठी यांनी शिक्का मारून स्वाक्षरी केली व या उतार्‍याच्या आधारे दुय्यम निबंधक व शासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल करण्यात आली व अन्य तिघा आरोपींच्या नावे शेतजमिनीचे पोकळस्त खरेदी खत नोंदवण्यात आले. ठाकूर यांनी 22 ऑगस्ट 2011 ते 31 जुलै 2013 या काळात सर्वे नंबर 53/ 3 /1 /2 मधील 2600 चौरस फुटांचा प्लॉटचे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्यचा आरोप असून तक्रारदार मोहम्मद अयुब मो. मसूद यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तलाठी ठाकूर यांच्यासह चौघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy